Tag Archives: डेंग्यू

यश चोप्रा काळाच्या पडद्याआड

यश चोप्रा

यश चोप्रा

ज्येष्ठ नामवंत दिग्दर्शक व निर्माता यश चोप्रा यांचे रविवारी मुंबईत लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांचे वय ८० होते.

सूत्रांच्या माहितीनुसार डेंग्यूची साथ झाल्याने त्यांना १३ ऑक्टोबर लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ‘जब तक है जान’ या त्यांच्या शेवटच्या चित्रपटातल्या एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी ते स्विस अल्प्सला जाणार होते पण प्रकृती साथ देत नसल्या कारणाने त्यांना मुंबईतच थांबावे लागले. ते बऱ्याच दिवसांपासून डेंग्यूमुळे अस्वस्थ होते, असे डोक्टरांचे म्हणणे आहे.

चोप्रा यांचा जन्म २७ सप्टेंबर १९३२ साली लाहोर येथे झाला. सुरुवातीला त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आय. एस. जोहर आणि त्यांचे बंधू बी. आर. चोप्रा यांच्या बरोबर काम केले. प्रेम कथांचं उत्कृष्ट दिग्दर्शन करण्याचा त्यांचा हातखंडा होता.

चोप्रा यांनी हिंदी सिनेसृष्टीत पाच दशके यशस्वी दिग्दर्श्क व निर्माता म्हणून कार्य केले. त्यांच्या या कारकिर्दीत त्यांनी ‘दीवार’, ‘त्रिशुल’, ‘चांदनी’, ‘सिलसिला’, ‘वीर झारा’ व असे अनेक हिट सिनेमे बनवले.

‘प्रेम नगरीचा राजा हरपला’, ही भावना सर्वजण व्यक्त करीत आहेत.