Tag Archives: धर्मनिरपेक्ष

सरकारची मजा आणि जनतेचे हाल

आज देशाला सर्वात मोठा धोका हा परकीय शक्ती पासून नाही तर राजकीय शक्ती पासून आहे. जर आपल्या देशातील राजकीय शक्ती चांगली असती तर परकीय शक्ती काहीच करू शकत नाही असे माझे ठाम मत आहे. पण आज काय झाले आहे कि सरकार स्थिर आहे त्यामुळे ते जनविरोधी निर्णय जनतेवर लादत आहे. यातच सरकार विरोधी सर्वच पक्ष षंढ आहेत ते याचा विरोध करताना दिसत नाही आहे. एक एक वेळा असे वाटते कि “तू मारल्या सारखा कर मी रडल्यासारखं करतो” असे करत आहेत. विरोधी पक्षाला लायक कोणताही पक्ष असेल तर तो आहे काँगेस, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कारण छोटा जरी मुद्दा असेल तर तो मोठा कसा करायचा आणि मोठा मुद्दा छोटा कसा करायचा हे त्यांच्या कडून शिकला पाहिजे. त्यांनी ५० वर्षाच्या कालखंडात भ्रष्टाचार, कटकारस्थान, धर्मनिरपेक्ष म्हणून जातीयवादी भूमिका या सारख्या अनेक मुद्द्यावर पी.एच.डी केली आहे. यामुळेच कोणताही तरुण राजकारणात यायला बघत नाही, जरी एखादा धाडस करून आला तर त्याला कसे संपवायचे हे सर्व राजकारणी लोकांना माहित आहे.

सध्याच्या मुद्द्यावर चर्चा करायची झाली तर आपले पंतप्रधान इतके आज्ञाधारक आहेत कि सांगायला नको. ते १९९१ च्या परिस्थिती बद्दल बोलले कि त्यावेळी जी परिस्थिती आली होती ती आज हि आली आहे. पण मी म्हणतो कि हि परिस्थिती येतेच कशी? कुणाकडेही जादूची कांडी नाही आहे कि एका दिवसात हि परिस्थिती आली. रुपयाचा भाव आज नाही कमी झाला तो बऱ्याच दिवसापूर्वी कमी झाला आहे. ते पुढे म्हणाले कि पैसे झाडाला लागत नाहीत. मग आम्ही पैसे काय झाडावरचे आणतो का? पैसे कमवायला कष्ट करावे लागतात हे पंतप्रधान विसरलेले दिसत आहेत. प्रत्येक गोष्टीवर कर आकाराला जातो, तो कुठे जातो? सरकार अनुदान देते ते काय स्वतःच्या पैशातून देते का? अनुदान द्यायला सरकार कडे पैसे नाहीत पण जो कर आकाराला जातो त्याचे पण उत्पन्न वाढले आहेच. हिम्मत असेल तर आमदार, खासदार यांचे पगार आणि पेन्शन कमी करा. मी म्हणतो कि पेन्शन बंदच करा. देशाचे उत्पन्न आपोआप वाढेल. जर संसद चालली नाही तर त्या दिवशीचा पगार कोणत्याही आमदार, खासदाराला देऊ नका उलट संसद चालवायला आलेला खर्च त्यांच्या कडून घ्या. बघा कसा देश सुधारतो ते. आपले गृहमंत्री बोलले ते योग्यच बोलले थोडे दिवस झाले कि लोक जुने घोटाळे विसरून जातील. उदाहरण द्यायचे झाले तर कलमाडी पुणे महोत्सवात पहिल्या रांगेत दिसले आणि आपल्या देशाचे गौरव असलेले अलोम्पिक वीर पाठीमागे. किती घोटाळे झाले त्यातील २५% जरी पैसे परत आले तरी १० वर्षे आपल्याला काही समस्या येणार नाही.

मी फेसबुक वर बऱ्याच पोस्त शेअर करतो त्या म्हणे सरकार विरोधी आहेत त्यासाठी मला बरेच मित्र असे करू नको म्हणतात कारण तू सरकार विरोधात जातो आहेस. पण मला सांगा मी काही चुकीचे करतो आहे का? सरकारने घोटाळे केले त्या बद्दल त्यांची आरती करू काय? त्यांनी ज्यावेळी चांगले निर्णय घेतले तेही मी शेअर केले आहेत (मला आठवत नाही आता) त्यावेळी कोणी नाही बोलला कि मी ती पोस्ट शेअर करून चुकी केली. या देशाचे राजकारणी जेव्हा बदलतील त्यावेळी देश बदलेल असे मला वाटते. या सरकार विरुद्ध जेवढे लिहायचे तेवढे थोडे आहे, पण राहावलं नाही. मी यात २-३ मुद्देच मांडले आहेत पण त्या प्रत्येक मुद्यावर एक एक पुस्तक लिहून होईल. लोकांना आणि सरकारला जागे करायची हीच वेळ आहे. तर कामाला लागा, दुसरा करत आहे तो करू दे असे म्हणून चालणार नाही आहे आता, राजकारणी लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे.

!! जय हिंद !!

!! भारत माता कि जय !!

!! वंदे मातरम !!