Tag Archives: नागीन

अपचन झाल्यास

  • अपचन झाल्यास थोडीशी बडीशेप किंवा जिरे, ताजे आले आणि कडीपत्ता गरम पाण्यात घाला. थोडा वेळ पाणी तसेच ठेवा. नंतर या पाण्यात १ कप पाणी घालून गाळून घ्या.
  • पोटात कृमी झाल्यास लसणाच्या ३-४ पाकळ्या काही दिवस सकाळी खाव्यात.
  • घसा बसल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे हा उत्तम उपाय आहे.
  • रात्री नाक चोंदल्यास नाकाच्या बाहेरील बाजूने राईचे तेल चोळल्याने श्वास घेणे सुलभ होते.
  • घश्यात खवखवत असल्यास किंवा खोकल्याची उबळ येत असल्यास एखाद दुसरी काळी मिरी तोंडात ठेवावी.
  • घामोळ्यामुळे कंड सुटल्यास शरीरावर दही चोळावं. १५ मिनीटानंतर धुवून टाकावं. हा उपचार काही दिवस चालू ठेवावा.
  • उन्हाळ्यात खूप उष्मा वाढू लागल्यास शरीर थंड ठेवण्यासाठी २ ग्लास पाण्यात १ टीस्पून बडीशेप घालून उकळून हे पाणी सकाळ-संध्याकाळ काही दिवस घ्यावे.
  • अतिसारावर घरगुती उपाय म्हणजे चमचाभर आल्याच्या रसात चिमूटभर मीठ घालून प्यावे. यामुळे वेदना थांबून अतिसार काबूत येतो.
  • नागीण किंवा इतर त्वचारोगांवर प्रभावी घरगुती उपाय म्हणजे तुळस. तुळशीची पाने वाटून किंवा पानाचा रस बाधीत त्वचेवर चोळावे.