Tag Archives: नेपोलियन बोनापार्ट

१५ ऑगस्ट दिनविशेष

जागतिक दिवस

 • स्वातंत्र्य दिन : भारत, कॉँगो, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया.
 • लिच्टेस्टाईन दिन : लिच्टेन्स्टेन.
 • सेना दिन : पोलंड.

ठळक घटना

 • १०५७ : लुम्फानानच्या लढाईत स्कॉटलंडचा राजा मॅकबेथचा अंत.
 • १२६१ : मायकेल आठवा पॅलियोलोगस बायझेन्टाईन सम्राटपदी.
 • १५१९ : पनामा सिटी शहराची स्थापना.
 • १५३७ : ऍसन्शन शहराची स्थापना.
 • १५४० : पेरूतील अरेकिपा शहराची स्थापना.
 • १६०९ : इंग्लंडच्या साउधॅम्टनहून मेफ्लॉवर जहाजात इंग्लिश प्रवासी निघाले. अमेरिकेत कायमस्वरूपी युरोपियन वसाहत निर्माण करणारी ही पहिली टोळी होती.
 • १८२४ : अमेरिकेतील गुलामगिरीपासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
 • १८७७ : थॉमस अल्वा एडिसनने सर्वप्रथम ध्वनिमुद्रण मेरी हॅड अ लिटल लॅम्ब या बालकवितेचे केले.
 • १९१४ : पनामा कालव्यातून पहिले जहाज पार झाले.
 • १९२० : पोलिश-सोवियेत युद्ध-वॉर्सोची लढाई – सोवियेत संघाचा पराभव.
 • १९४४ : दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांचे सैनिक फ्रांसच्या दक्षिण भागात उतरले.
 • १९४५ : दुसरे महायुद्ध – जपानने शरणागती पत्करली.
 • १९४७ : भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९४७ : मोहम्मद अली झीणा पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.
 • १९४८ : दक्षिण कोरियाची निर्मिती.
 • १९६० : कॉँगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 • १९७१ : अमेरिकेने आपल्या चलन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित केले.
 • १९७१ : बहरैनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९७५ : बांगलादेशमध्ये लश्करी उठाव. शेख मुजिबुर रहमान व कुटुंबियांची हत्या.
 • १९८२ : भारतामध्ये दूरदर्शनचे रंगीत प्रक्षेपण सुरु झाले.
 • १९९९ : अल्जीरियात दहशतवाद्यांनी २९ लोकांना ठार मारले.
 • २००७ : पेरूजवळ पॅसिफिक महासागरात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप. ५१४ ठार, १,०९० जखमी.

जन्म

 • १००१ : डंकन पहिला, स्कॉटलंडचा राजा.
 • १७६९ : नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.
 • १८१३ : जुल्स ग्रेव्ही, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
 • १८७२ : श्री ऑरोबिंदो (योगी अरविंद), भारतीय तत्त्वज्ञानी.
 • १८८६ : बिल व्हिटली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९१३ : भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक.
 • १९२७ : एडी लेडबीटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९४५ : बेगम खालेदा झिया, बांगलादेशची पंतप्रधान.
 • १९४७ : राखी गुलझार, भारतीय अभिनेत्री.
 • १९५१ : जॉन चाइल्ड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९५१ : रंजन गुणतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६३ : जॅक रसेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९६८ : डेब्रा मेसिंग, अमेरिकन अभिनेत्री.
 • १९७२ : बेन ऍफ्लेक, अमेरिकन अभिनेता.
 • १९७५ : विजय भारद्वाज, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मॄत्यु

 • १०३८ : स्टीवन पहिला, हंगेरीचा राजा.
 • १०४० : डंकन पहिला, स्कॉटलंडचा राजा.
 • १०५७ : मॅकबेथ, स्कॉटलंडचा राजा.
 • १११८ : ऍलेक्सियस पहिला कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट.
 • १९३५ : विल रॉजर्स, अमेरिकन अभिनेता.
 • १९७५ : शेख मुजिबुर रहमान, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.
 • २००४ : अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री.