Tag Archives: न्यायालय

पद्मनाभ मंदिराचा खजिना दशलक्ष कोटींचा

पद्मनाभ मंदिर

सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने प्राथमिक निष्कर्ष काढला की, पद्मनाभस्वामी मंदिर जे केरळचे ऐतिहासिक मंदिर आहे, त्यात दहा लाख कोटींचा खजिना सापडला आहे. सूत्रांनी तशी माहिती दिली. ही समिती आपला अहवाल येत्या ८ ऑगस्टला न्यायालयात सादर करणार आहे.

गेल्या वर्षापासून या खजिन्याची जाहीर वाच्यता झाल्यामुळे हा जगभर चर्चेचा विषय ठरला आहे. तीनस्थरीय सुरक्षाव्यवस्थेचे कडे सध्या मंदिराभोवती आहे. एक लाख कोटीचे मूल्य असल्याचा अंदाज या खजिन्याची मोजदाद करण्यापूर्वी वर्तविला जात होता. पण आता असे स्पष्ट झाले आहे की प्रत्यक्षात या खजिन्याचे मूल्य अंदाजापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. हा खजिना मंदिराच्या तळघरातील सहा कोठारांमध्ये आहे. न्यायालयाने याची देखरेख व मोजदाद करण्यासाठी एक समिती नेमली आहे. या खजिन्याची इत्थंभूत माहिती फक्त न्यायालयालाच देण्याचे आदेश त्यांना करण्यात आलेले आहेत.

काय दडले आहे या खजिन्यात?
या मंदिराच्या तळघरामध्ये सोन्याच्या विटा, सोन्या चांदीची आभूषणे, जडजवाहीर, देवदेवतांच्या सोन्या-चांदीच्या मूर्ती, विष्णू देवाच्या नवरत्नातील मूर्ती, सोने, चांदी, तांबे, पितळेची भांडी, नाणी आदी असा खजिना सापडला आहे. असेही सांगितले जात आहे की या खजिन्यात १८ फूट लांबीचा सोन्याचा साखळदंडही आहे. एक हजार वर्षांपूर्वीचा हा खजिना असल्याचा अंदाज आहे.