Tag Archives: पंचामृत

पंचामृत

साहित्य :

 • १०० ग्रॅम हिरव्या मिरच्या
 • १०-१२ पाने कढीलिंब
 • अर्धी वाटी भाजून सोललेले दाणे
 • कोथिंबीर
 • सुक्या खोबऱ्याचे कातलेले १५-२० तुकडे
 • पाव वाटी तिळाचे कूट
 • पाव वाटी दाण्याचे कूट
 • अर्धा चमचा मीठ
 • अर्ध्या लिंबाएवढी चिंच
 • १ लिंबाएवढा गूळ
 • अर्धा चमचा गोडा मसाला
 • अर्धी वाटी तेल
 • फोडणीचे साहित्य

कृती :

पंचामृत

पंचामृत

तेलावर दाणे व खोबऱ्याचे तुकडे अर्धवट तळून झाले की त्यात १ चमचा मोहरी, जिरे, हिंग,हळद, कढीलिंब, मिरच्याचे तुकडे घालून परतून घ्यावे.

त्यात दीड भांडे पाणी घालून तिळाचे व दाण्याचे कूट घालावे.

मीठ, चिंचेचा कोळ, मसाला, गूळ घालून उकळावे.

उतरल्यावर कोथिंबीर घालावी.

पंचामृत ५-६ दिवस चांगले टिकते.