Tag Archives: पंडित भीमसेन जोशी

६० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

हीरक महोत्सवी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

हीरक महोत्सवी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचं यंदाचं हीरक महोत्सवी वर्ष आहे. सवाई गंधर्व कुंदगोळकर या आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ त्यांचे शिष्य पंडित भीमसेन जोशी यांनी १९५२ साली पुण्यात हा महोत्सव सुरु केला. अभिजात शास्त्रीय संगीताची रसिकांना पर्वणी देणारा हा देशातील एकमेव महोत्सव. दिग्गज गायक आणि वादक यांच्या कलाविष्काराने सवाई महोत्सवाची देशातच नव्हे तर विदेशात एक वेगळी ओळख निर्माण झाली. पंडित भीमसेन जोशी यांनी या महोत्सवाच्या माध्यमातून गुरू-शिष्य परंपरा कायम ठेवली. पंडितजी स्वत: कायम कलाकारांच्या निवडी बाबत चोखंदळ असायचे आणि यामुळेच या महोत्सवाला वेगळेपण बहाल झाले. विविध राज्यांतले आणि भाषेतल्या कलाकारांचा संगम त्यांनी या मंचावर घडवला. तसेच नवोदित कलाकारांना त्यांनी व्यासपीठ ही उपलब्ध करून दिले. आज अनेक दिग्गज कलाकार सवाईत एकदातरी आपली कला सादर करण्याची मनिषा बाळगून असतात. यामूळेच आज सवाई महोत्सवाला संगीताची पंढरी म्हटल्यास वावगं ठरू नये.

दिवसेंदिवस सवाई महोत्सव बहरत आहे. ६० वर्षांच्या वाटचालीत सवाईची लोकप्रियता यत्किंचितही कमी झाली नाही उलट ती वाढतच आहे. यंदाही दररोज २० लाख रसिकांच्या उपस्थितीत हा महोत्सव रंगत आहे. युवा वर्ग तसेच आबाल वॄध्द आणि परदेशी नागरिक इथं मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. पॉप, झॅज च्या दिवसांतही सवाईला मिळणारा तूफान प्रतिसाद खरोखरीच सवाई आहे.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव फोटो
[nggallery id=129]