Tag Archives: पंडित सी.आर.व्यास

चिंतामणी जयंती समारोह २०१२

कै. पंडित सी. आर. व्यास यांच्या ८८ व्या जयंती निमित्त त्रिदिवसीय संगीतमहोत्सव

चिंतामणी जयंती समारोह २०१२

चिंतामणी जयंती समारोह २०१२

पंचम निषाद क्रिएटिव्स सादर करत आहे त्रिदिवसीय हिन्दुस्तानी संगीतमहोत्सव चिंतामणी जयंती समारोह. ७, ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड, पुणे येथे संध्याकाळी ७.०० वाजता संगीत सोहळा संपन्न होत आहे. ह्या कार्यक्रमास प्रायोजकत्व देऊन भारतीय पारंपारिक कलेचा वारसा जपण्यासाठी पंचम निषादला टाटा कॅपिटलने सहकार्य केले आहे.

२००२ साली दिग्गज गायक कै. पं. सी. आर. व्यास यांच्या अचानक जाण्याने संगीतप्रेमीना मोठा धक्का बसला. परंपरा, व्यक्तिमत्व, समर्पण आणि विशुध्दता यांचे प्रतीक असलेले कै. पंडित सी. आर. व्यास भारतातील अग्रगण्य गायक होते. ह्या वर्षी ९ नोव्हेंबर रोजी त्यांच्या ८८ व्या जयंती निमित्त त्यांना संगीतमय श्रध्दांजली वाहण्यासाठी मोठमोठे कलाकार एकत्र येणार आहेत.

गेली ९ वर्षे पंचम निषादतर्फे ‘चिंतामणी जयंती समारोह’ चे आयोजन करण्यात येत आहे. तीन दिवस चालणारा हा समारोह संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करेल.

 • शंकर महादेवन (गायन)
 • देवकी पंडीत (गायन)
 • यु. श्रीनिवास (मॅडोलिन)
 • पारस नाथ (बासरी)
 • आदित्य कल्याणपूर (तबला)
 • गिरिधर उडुपा (घटम)
 • श्रीधर पार्थसार्थी (मृदंगम)
 • सतिश व्यास (संतूर)
 • बेगम परविन सुल्ताना (गायन)
 • सुहास व्यास (गायन)
 • रईस खान (सतार)

अशा अनेक दिग्गज कलाकारांचा या वर्षी ‘चिंतामणी जयंती समारोह’ मध्ये समावेश असेल.

पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडीत यांच्या गायकीचा आनंद लुटता येईल. मध्यातरानंतर उत्कृष्ट गायक शंकर महादेवन, मॅडोलिन वादक यु. श्रीनिवास, बासरी वादक पारस नाथ, तबला वादक आदित्य कल्याणपूर, घटम वादक गिरिधर उडुपा, मृदंगम वादक श्रीधर पार्थसार्थी या कलाकारांचा मैफिलीत समावेश असेल.

दुसर्‍या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये नामवंत संतूर वादक सतीश व्यास आणि प्रसिध्द गायिका बेगम परविन सुल्ताना अशा नावाजलेल्या कलाकारांचा समावेश असेल.

तिसर्‍या दिवशी प्रसिध्द शास्त्रीय गायक सुहास व्यास यांचे गायन व विख्यात सतारवादक उस्ताद रईस खान व त्यांचे सुपुत्र फरहान हे सतारवादनाची जुगलबंदी सादर करतील. ह्या अगदी विशेष परफॉर्मन्ससह संध्येची सांगता होईल.

पंचम निषाद क्रिएटिव्हसचे संचालक श्री. शशी व्यास म्हणाले, या वर्षीचा हा समारोह हा आमच्यासाठी खास आहे कारण की या वर्षीच्या समारोहाचे हे यंदाचे १० वे वर्ष आहे. पंचम निषादचे भाग्य कि या वर्षीच्या समारोहात उस्ताद रईस खान, बेगम परवीन सुल्ताना व पंडित सुहास व्यास यांसारखे दिग्गज कलाकार उभरत्या कलाकारांबरोबर या महोत्सवात कार्यक्रम सादर करणार आहेत. पुणे शहरातील रसिकांचे हा समारोह चालू झाल्या वर्षापासून ते आतापर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल पंचम निषाद आभार मानते. गेल्या १० वर्षापासून रसिकांचा प्रतिसाद जाणकारांपासून ते सामान्य रसिकांपर्यंत सतत वाढतच आहे. “ह्या संध्येमध्ये दिग्गज कलाकार एकामंचावर पंडितजींना श्रद्धांजली अर्पण करतील.”

ह्या कार्यक्रमामध्ये आजपर्यंत

 • किशोरी आमोणकर
 • शुभा मुदगल
 • हरिप्रसाद चौरशिया
 • एल. सुब्रमण्यम
 • विक्कू विनायकराम
 • जगदिश प्रसाद
 • रोणू मझुमदार
 • रशिद खान
 • फजल कुरेशी
 • सतिश व्यास
 • व्ही.सेल्वा गणेश. सुहास व्यास
 • राजन आणि साजन मिश्रा
 • बेगम परवीन सुल्ताना
 • मालिनी राजुरकर
 • वसुंधरा कोमकली
 • बुधदित्य मुखर्जी
 • कला रामनाथ
 • श्रीराम शिंत्रे
 • संजीव चिम्मलगी
 • श्रीपती हेगडे

अशा अनेक मातब्बर आणि युवा कुशल कलाकारांचा समावेश करण्यात आलेला आहे.

ह्या कार्यक्रमासाठीच्या पूर्णोत्सव तिकीटांचे दर रू.६००, ४०० आणि २५० असून ते कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि बालगंधर्व रंगमंदिर येथे १ नोव्हेंबर २०१२ पासून उपलब्ध असतील.

तिकीटांसाठी संपर्क साधा : सत्यजित : ९८२२३१८०३९

चिंतामणी जयंती समारोह २०१२ फोटो
[nggallery id=114 images=10]