Tag Archives: पनीर

नवरत्न पुलाव

साहित्य:

 • १॥ कप तांदुळ
 • १०० ग्रा. फ्रेंचबीन
 • १०० ग्रा. वाटाणे
 • २ बटाटे
 • १०० ग्रा. गाजर
 • ३ कांदे
 • ४ टे. तुप
 • टोमॅटोचे स्लाइज
 • कोथिंबीर
 • १०० ग्रा. पनीर
 • थोडा कोबी
 • तळण्यासाठी तूप
 • मीठ

कृती:

नवरत्न पुलाव

नवरत्न पुलाव

पनीरचे छोटे छोटे तुकडे करून तळावे. तांदळास वेगळे शिजवून घ्यावे. भाजीचे छोटे छोटे तुकडे करून उकळावे.

एका भांड्यात तूप गरम करून वाटलेला मसाला तळुन घ्यावा. २-३ मिनीट तळल्यानंतर भाज्या टाकाव्या व परत तळावे थोड्या वेळाने तांदुळ, मीठ, कांदा, पनीर टाकावे आणि २-३ मिनीट शिजवावे.

उरलेल्या तळलेल्या पनीराने व कांद्याने वरून सजवावे.