Tag Archives: परिपत्रक

शाळांना कारवाईला सामोरे जावे लागेल

शाळांना कारवाईला सामोरे जावे लागेल

शाळांना कारवाईला सामोरे जावे लागेल

राज्याच्या सर्व शाळा १५ जूनला सुरु करण्याचा सरकारी आदेश आहे व या आदेशाचे ज्या शाळा उल्लंघन करून ११ जूनला सुरु होतील, त्या शाळांना कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी हा इशारा दिला आहे.

यापूर्वीच जाधव यांनी पुणे शहरातील सर्व शाळांना १५ जूनपासून शाळा सुरु करण्याबाबतचे सविस्तर परिपत्रक पाठविले आहे. ‘शाळांना या आधीच योग्य सूचना देण्यात आली आहे. पण याउपरही शाळांनी शासकीय आदेशाचे पालन केले नाही, तर त्यांना नोटीस पाठवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल,’ असे जाधव यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात जेव्हा शिक्षण उपसंचालकांनी कारवाईचे आदेश पाठविले, तेव्हा अनेक इंग्रजी शाळांनी आपल्या वेळापत्रकात बदल करुन शाळा १५ जूनला सुरु करण्याचा निर्णय घेतला.