Tag Archives: पांडुरंग करमरकर

२ ऑक्टोबर दिनविशेष

महात्मा गांधी(मोहनदास करमचंद गांधी)

महात्मा गांधी

मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ – जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. महात्मा या संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ आहे ‘महान आत्मा’. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते.नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. ते सत्याग्रहाचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.

असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची सुत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, स्त्रीयांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. यासाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.

गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला आणि स्वतःपण याच तत्त्वांनुसार जगले. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी जन्मभर शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा धार्मिक कारणांसाठी तसेच विरोधाचे साधन म्हणून दीर्घ उपवास केले.

ठळक घटना

  • १९७२ : मुंबई दूरदर्शनची सुरुवात.
  • १९७८ : महाराष्ट्रात प्रौढ शिक्षणाचा कार्यक्रम कार्यन्वित झाला.

जन्म

  • १८६९ : महात्मा गांधी(मोहनदास करमचंद गांधी) जयंती. गांधी जयंती शुभेच्छापत्रे
  • १९०४ : भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती.
  • १८९१ : भारतातील सुप्रसिध्द शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म.

मृत्यू