साहित्य :
- २५० ग्रॅम खवा
- १ वाटी पिठीसाखर
- २५ ग्रॅम बदाम
- ५-६ वेलदोड्यांची पूड
- पाव चमचा बदामाचा इसेन्स
- थोडेसे केशर.
कृती :
खवा हाताने मोडून घ्या. बदाम भिजत घालून सोलून घ्या. नंतर दूध घालून वाटून घ्या.थोड्या तुपावर परतून घ्या. त्यातच बदामाचा गोळा मिसळा व जरा बदामी रंग येईपर्यंत परतून घ्या व उतरा. वरील मिश्रण कोमट झाले की त्यात पिठीसाखर घाला. वेलचीपूड, केशर घाला व तूप लावलेल्या ताटात थापा. थंड झाल्यावर दुसऱ्या दिवशी वड्या कापाव्या.