Tag Archives: पालक

सरसोची भाजी

साहित्य:

 • ५०० ग्रा. सरसो
 • १५० ग्रा. पालक
 • ५० ग्रा. पीठ
 • २ लाल मिरच्या
 • १ तुकडा कापलेले आले
 • २ कापलेल्या हिरव्या मिरच्या
 • १ कपलेला कांदा
 • १/२ चमचा गरम मसाला
 • ४ पाकळी लसूण
 • १ चमचा लिंबाचा रस
 • १/२ कप ताजे क्रीम
 • ३ मोठे चमचे तूप
 • चवीनुसार मीठ

कृती:

सरसोची भाजी

सरसोची भाजी

सरसो व पालक धुवून बारीक कापावे. २ कप पाण्याबरोबर कूकरमध्ये तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे.
गव्हाच्या पिठास थोड्या पाण्यात मिळवून मीठ, तिखट, गरम मसाला, आले आणि क्रीम मिळवावे.
एक चमचा तुपातं पीठाच्या मिश्रणास सोनेरी भाजून उतरवून घ्यावे. एका दुसर्‍या कढईत उरलेले तूप गरम करून जीर, कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या तोडुन टाकावी व फ्राय झाल्यावर पिठाच्या मिश्रणास मिळवावे.
२ मिनीटानंतर सरसो व पालक टाकुन चांगल्या तर्‍हेने घोटावे. पाच-सात मिनीट शिजवून उतरवून घ्यावे वरून लोणी टाकावे आणि मक्याच्या चपातीबरोबर वाढावे.