Tag Archives: पाहुणा

शेतकऱ्याची कविता

मी एक शेतकरी दिवसभर उन्हातान्हात
राबणारा
माती हेच माझे दैवत
कष्टाच्या ओंजळूतून घामाची फुलं
वाहत राहणं हीच माझी पुजा
मी म्हणजे एक काळोखाचा तुकडा
चहूबाजूनी मला वेढलंय उजेडानं पण
माझ्यात मात्र ठासून अंधार भरलाय …
दुःखालाच सुख मानून मी हसतो आहें..
घरच्याच पंगतीला मी मात्र
पाहूण्यासारखा बसतो आहे.