Tag Archives: पिठले

कुळीथ पिठले

साहित्य :

  • अर्धी वाटी कुळीथ पीठ
  • ८-१० कढिलिंबाची पाने
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  • अर्धा चमच मीठ
  • कोथिंबीर
  • २ आमसुले
  • २ पळ्या तेल
  • फोडणीचे साहित्य

कृती :

तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्यांचे तुकडे, कढिलिंबाच्या पाने घालून फोडणी करावी.त्यात ३ भांडी पाणी घालावे. ते थोडेसे उकळायला लागल्यावर त्यात मीठ, आमसुले घालावीत. कुळथाचे पीठ पाण्यात कालवून घालावे व ढवळत राहावे. उकळी आली की खाली उतरवून त्यात कोथिंबीर घालावी व जेवताना गरम गरम द्यावे.