Tag Archives: पुदिना

पाणी पुरी

पाणी पुरी

पाणी पुरी

साहित्य :

 • ६-७ मोठे कप पाणी
 • थोडासा पुदिना
 • लिंबाएवढी चिंच
 • २-३ हिरव्या मिरच्या
 • लहानसा आल्याचा तुकडा
 • १ चमचा जीरे
 • २-३ लवंगा
 • १/४ चमचा मिरपूड
 • थोडे लाल तिखट
 • थोडा गूळ
 • मीठ
 • १/२ लिंबाचा रस

सारणासाठी :

 • १ वाटी मोड आलेले हळद घालून वाफवलेले मूग
 • २-३ उकडलेले बटाटे

कृती :

चिंचेचा कोळ तयार करुन घ्यावा. मिरच्या, आले, पुदिना, जीरे, लवंगा, मिरपूड, तिखट, मीठ ह्यांची बारीक चटणी करुन घ्यावी. नंतर वाटलेली चटणी, चिंचेचा कोळ व गूळ एकत्र करावे. ह्या पाण्यात लिंबाचा रस घालावा. चांगली चव येते. प्रत्येक पुरी वरच्या बाजूने थोडी फोडून त्यात ८-१० मूग व थोडा बटाट्याचा चुरा भरुन व वरील पाण्यात बुडवून प्लेट्स तयार कराव्यात. लगेचच खाव्यात.