Tag Archives: प्रदर्शन

अंकूर समाजहिताचा

निरुपोयोगी वस्तू

निरुपोयोगी वस्तू

देणे समाजाचे – समाजासाठी हे अगळे-वेगळे प्रदर्शन नुकतच मातोश्री वृध्दाश्रमात भरवण्यात आलं आलं होतं. या समाजपोयोगी प्रदर्शनाला पुणेकरांचा भरघोस पाठिंबा मिळाला. अंकूर प्रतिष्ठान च्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात चांगल्या पण निरुपोयोगी वस्तू दान करण्याचं आवाहान करण्यात आलेलं होतं. या अवाहानाला पुणेकरांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला आणि बघता बघता टिव्ही, कॉमप्यूटर, वॉशिंग मशीन, प्रिंटर, डायनिंग टेबल, डिनर सेट, भांडी, खेळणी, पुस्तके यासांरख्या अनेक वस्तु जमा झाल्या. या वस्तू जमा करण्यासाठी जसा प्रतिसाद मिळाला तसाच त्या वस्तू घेण्यासाठी मिळाला. या प्रदर्शानाच्या माध्यमातून या सर्व वस्तू विनामूल्य गरजूनां उपल्बध करून देण्यात आल्या.

कुलदीप सावलेकर

कुलदीप सावलेकर

दिवाळीच्या अधी बरेच जण घरात साफ सफाई करत असतात अशावेळी अनेक जुन्या वस्तू आपण टाकून देतो. अशाच जून्या पण चांगल्या वस्तू गोळा करून त्या गरजू पर्यंत पोहचवून त्यांची दिवाळी अधिक आंनदी करण्यात अंकुर प्रतिष्ठानने मोलाची भुमिका बजावली. नव्या घेतल्या म्हणून किंवा हौसेखातर घेतलेल्या गेलेल्या अनेक वस्तू सधन कूटूंबात तशाच पडून असतात तर कष्टकरी वर्ग गरज असूनही या गोष्टींपासून वंचित असतो. सधन आणि कष्टकरी वर्ग यांच्यातील दरी कमी करण्याचा हा लहानासा प्रयत्न आहे असे अंकूर प्रतिष्ठानचे सदस्य कुलदीप सावलेकर यांनी सांगितलं. या प्रदर्शानाला गरिब वस्त्या आणि गरजू संस्थांना निमंत्रण देण्यात आलं होतं. अंकुर प्रतिष्ठान च्या वतीने दर वर्षी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.