Tag Archives: भटकंती

सुट्टीतील धमाल करुया कमाल

सुटीतील धमाल करुया कमाल

मुलांची परिक्षा संपते आणि पालकांची परीक्षा सुरू होते. आई मी काय करू? कंटाळा आला, कोणती शिबिरे? कोणला सहली? नुसतीच भांडणे, आळस ? अशा अनेक प्रश्नपत्रिका घेऊन मुलांची सुट्टी येते…. ही प्रश्नपत्रिका पालक मुलांनी एकत्र येऊन सोडवणे अवश्यक असते.

चला तर मग करु या आपली सुट्टी मजेशीर.

गेल्या वर्षीच्या वह्या, पुस्तकाबरोबर सुटीतले उपक्रम वजनांचा अंदाज नेमका बरोबर येतो का? ते पहाणे, कोऱ्या पानांच्या घरी वह्या बनवणे. चित्रकला वहीतील चांगल्या चित्रांनी आपले कपाट सजवणे किंवा कोणला देण्यासाठी भेटवस्तू बनवण्यासाठी त्याचा उपयोग करणे.

पुढच्या वर्षासाठी लागणारे सामान कोणते असेल याची यादी करणे, खरेदी करणे, कोणते सामान न आणता आपल्याकडे असलेल्या गोष्टी परत वापरता येतील का ते पाहणे. उदा. दप्तरांना चेन तुटली तर शिवून आणणे. जुन्या दप्तराला स्टिकर्स लावून नवा लूक देण.

उन्हाच्या वेळी – घरीच्या घरी

 1. नव्या सरबताचे प्रयोग करून पाहणे.
 2. लहान लहान सोपी अशी कोडी सोडवणे.
 3. जुने फोटो, सहलीचे, वाढदिवसाचे फोटो पाहून आठवणी तयार करणे.
 4. घरात येणाऱ्या व्यक्तीच्या मुलाखती घेणे. (मग ते धुणेवाली कामवाली, इस्त्रीवाले इ. )
 5. संध्याकाळी आकाशाचे निरीक्षण करणे.
 6. पहाटे पक्ष्यांचे आवाज ऐकणे, पक्ष्यांच्या दिनक्रमांची निरीक्षणे करण्याचा प्रयत्न करणे.
 7. नवीन पालवीचे निरीक्षण करणे

कला

 1. विविध बियांचे चित्र तयार करणे (उदा. कलिगंड, खरबुजतल्या बिया)
 2. मुक्त आपल्याला आवडणाऱ्या गाण्यावर नाच करणे
 3. तसेच vegetable decoration तयार करणे.

गाठी भेटी

 1. आपले नातेवाईक, लहान बाळांना आईवडीलांसोबत भेटायला जाणे त्यांचे निरीक्षण करणे घरी येवून त्यावर चर्चा करणे.
 2. आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या व्यक्तीकडून त्यांनी केलेल्या कर्तृत्वाच्या गोष्टी ऐकणे.
 3. आपल्या शहरात आलेल्या परदेशी पर्यटकांच्या भेटी घेणे.
 4. पत्र लिहून लांबच्या लोकांच्या संपर्क साधणे.

थोड काही वेगळ

 1. ओळखीच्या व्यावसायिकांचा कारखाना बघायला जाणे.
 2. आंबे विक्रेत्यांकडे, आंब्याच्या पेट्या, आंबाची अढी घालणे. यासारखा विविध फळांच्या कलमांच्या व्यवस्था पहायला जाणे.
 3. आईस्क्रिम पॉट कसे बनविले जातात ते पहायला जाणे.
 4. उसाचा रस कसा बनवला जातो त्याची माहिती घेणे.
 5. माठ कसा बनवला जातो त्याची कृती समजवून घेणे.
 6. घर कामात मदत करा, भाजीबाजार आणणे.

भटकंती

 1. आसापासच्या टेकंड्यावर जाणे.
 2. नेहमी पेक्षा (कधी न गेलेल्या) बागेत जाणे.
 3. प्रत्येक ठिकाणी (जास्त दूरचे अंतर सोडून) पायी जाण्याचा प्रयत्न करणे.
 4. विविध खेड्यांना भेटी देणे.

खेळ

 1. शारिरीक व्यायाम
 2. मैदानी खेळ
 3. कोडी, शाब्दिक खेळ
 4. बैठे खेळ
 5. पाठांतर आणि स्मरण खेळ

शिबिरे

 1. चांगल्या व निवडक शिबिरांना जावे. शिबिरात मुलांची गमतीतून आनंद घेत शिकणे महत्त्वाचे.
 2. शिबिरात नवनवीन मित्र तयार करणे त्यांच्याबद्दलची माहिती त्यांच्यातील वेगळेपण डायरीत लिहून ठेवणे.

असा स्वछंद वेळ देण्याबरोबर ह्या वेळेचा हिशोब मुलांकडे मागू नये.

मातीत उन्हातान्हात पाण्यात खेळण, रंगामध्ये बेकल रेघोट्या ओढणे हा लहान मुलांचा स्थायीभाव असतो. सर्जनशिलतेला वाव द्या. त्यांचे खेळ, कार्यक्रमे कामाचे नियोजन त्यांना स्वतःलाच करु द्या त्यासाठी प्रोत्साहन द्या.

दोन शैक्षणिक वर्षाच्या मध्ये येणारी सुटी-शालेय चक्राचा कंटाळा घालविणारी, शांत निवांत, मनाला विरंगुळा देणारी, पुढच्या वर्षांसाठी ताजे – टवटवीत करणारी ठरते आता चला त्यांच्यासोबत आपणही सहभागी होऊ ह्या !