Tag Archives: भाताचे प्रकार

गोडभात

साहित्य:

 • १ कप बासमती तांदुळ
 • २ कप पाणी
 • १ कप साखर
 • १/२ कप मनुका
 • १/२ कप मेवे
 • २ मोठी चमचे तूप
 • १ चुटकी केसर
 • १ चुटकी जायफळ पावडर
 • २ छोटी विलायची
 • २ लवंग
 • २ चांदीची वर्क

कृती:

गोडभात

गोडभात

दीड कप पाण्यात तांदळास उकळून घ्यावे. अर्धा कप पाण्यात साखर टाकून पाक बनवावा.

चमचा गरम पाण्यात केशर मिळवून टाकावी एका दुसर्‍या कढईत तूप गरम करावे आणि लवंग, विलायची फ्राय करावे.

आता तांदूळ टाकुन पाक टाकावा व हलकेच मिळवावे. मनुके, जायफळ आणि मेवे टाकून गॅस कमी करावा.

पाणी सुकल्यानंतर डीश मध्ये काढून चांदीचा वर्क लावावा.