Tag Archives: मध

गांधील माशी मधाची कुपी

एक उघडया तोंडाची मधाची कुपी काही गांधील माशांच्या दृष्टीस पडली. त्यातला मध खावा म्हणून मोठया अधाशीपणाने त्या सगळ्या माशा घाईने आत शिरल्या. त्यामुळे कुपीत त्यांची इतकी गर्दी झाली की, तिच्यातून त्यांना बाहेर येता येईना. मग त्या माशा तेथेच गुदमरून मरण पावल्या.

तात्पर्य:- अधाशीपणाचा परिणाम केव्हा केव्हा अगदी ताबडतोब भोगावा लागतो.