Tag Archives: मशरूम

मसालेदार बासमती पुलाव

साहित्य:

  • बासमती तांदुळ २०० ग्रा.
  • हिरवी कोबी २०० ग्रा.
  • ७-८ छोटी विलायची
  • थोडीशी काळी मिरची
  • एक-दोन इंच दालचिनी
  • एक छोटा चमच हळद
  • ५ कप उकळलेले पाणी
  • ६० ग्रा. मनुका
  • मीठ
  • ६ मोठे चमचे तूप किंवा तेल

कृती:

मसालेदार बासमती पुलाव

मसालेदार बासमती पुलाव

तांदळास चांगल्या प्रकारे धुवून घ्यावे. कोबीस कापून घ्यावे. एका कढईत तेल गरम करावे. त्यात कांदा, हिरवी कोबी टाकुन ३ मिनीट भाजावे.

त्यात मशरूम, तांदुळ, लसूण आणि सर्व मसाल्यास टाकुन एक मिनीटापर्यंत शिजवावे.

उकळलेले पाणी आणि मीठ टाकुन झाकावे. १५ मिनीटपर्यंत गॅस कमी करून ठेवावे.

आता याला गॅसवरून काढून १५ मिनीटापर्यंत उघडे ठेवावे. त्यात मनुके टाकुन थोडेसे हलवून गरम गरम वाढावे.