Tag Archives: माधुरी शाह

शिक्षण

फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे

फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे

छत्रपती शाहु महाराजांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी शिक्षणाचा प्रसार केला. शिक्षणाच्या प्रसाराने मने संस्कारित झाली म्हणजे जातिभेद नष्ट होईल या भावनेने त्यांनी सार्वजनिक शिक्षणाची मोहीम कोल्हापूर संस्थानात सुरू केली. अस्पृश्य समाजातील शिकलेल्या मुलांना त्यांनी नोकऱ्या दिल्या इतकेच नव्हे तर दुर्बल घटकांसाठी राखीव जागाही ठेवल्या.शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्थांना त्यांनी आर्थिक पाठबळ दिले. शिक्षणाचा प्रसार ग्रामीण भागात करीत असतांना शिक्षणासाठी दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी वेगवेगळ्या जाती-धर्मांसाठी अनेक वसतिगृहांची स्थापना केली. कोल्हापुरातच नव्हे तर नाशिक, नगर, पुणे आदि मोठ्या शहरात त्यांनी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आणि राहण्यासाठी वसतिगृहे सुरू केली.

छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक समतेच्या विचारांनी प्रेरित झालेल्या अनेक व्यक्तींची पुढे शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला वाहून घेतले. कर्मवीर भाऊराव पाटील हे त्यांपैकी एक होत.

बहुजन समाजाला शिक्षण देऊन त्यांची सर्वांगीण प्रगती साध्य करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये रयत शिक्षण संस्था स्थापन केली. कराड जवळ काळे या गावी एक वसतिगृह स्थापन होऊन या संस्थेच्या कार्यास प्रारंभ झाला. १९२४ मध्ये रयत संस्थेने सातार येथे अस्पृश्यांसह सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू बोर्डिंग हे दुसरे वसतिगृह स्थापन करण्यात केले. गांधींनी १९२७ मध्ये या वसतिगृहास भेट दिली. १९४२ मध्ये सातारा येथे विद्यार्थिनींसाठी वसतिगृह स्थापन करण्यात आले. रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातीएल एक मान्यवर संस्था असून या संस्थेने राज्यात ५७८ प्राथमिक शाळा सुरू केल्या आणि नंतर प्राथमिक शिक्षण सक्तीने झाल्यानंतर त्या जिल्हा स्कूल बोर्डाच्या स्वाधीन केल्या. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात संस्थेने आतपर्यंत ३१३ माध्यमिक शाळा आणि २१ महाविद्यालये स्थापन केले आहेत. माध्यमिक विद्यालये धरून ही संस्था स्त्रीशिक्षणासाठी राज्यात १७ शैक्षणिक शाखा चालवीत आहे. १९७४-७५ मध्ये विद्या प्रबोधिनी स्थापन करण्यात आली व त्या द्वारे स्पर्धा परीक्षात ग्रामीण भागातील मुलांची बौद्धिक वाढ आणि विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले.

महाराष्ट्रातील १३ आणि कर्नाटकातील १ अशा एकूण १४ जिल्ह्यात संस्थेचे शैक्षणिक कार्य चालू आहे.

संस्थेतर्फे एकूण ७ अध्यापन विद्यालये चालविण्यात येतात. त्यापैकी १ स्त्रियांसाठी आहे. मुलांसाठी एकूण ७४ वसतीगृहे चालविण्यात येतात. शालेय शिक्षणाबरोबरच तांत्रिक शिक्षण आणि कृषि विज्ञान शिकविण्यासाठी खास ३२ शाखा सुरू करण्यात आल्या आहेत.

स्वातंत्र्योत्तर काळात १९६१ पर्यंत महाराष्ट्रातील बहुसंख्य खेड्यात साक्षरतेची प्रगती एकाच वेगाने झालेली नाही. काही खेड्यांत साक्षरतेचे प्रमाण ४५% होते तर काही खेड्यांत १०% होते. बहुतेकदा स्त्रियांमधील साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या निम्मे होते आणि लहान विकेन्द्री खेड्यात ही तफावत जास्तदेखील होती. केंद्रभूत खेड्यांची लोकवस्ती जास्त व तेथे शिक्षणाच्या सोयीही अधिक असत. त्यामुळे सीमेजवळील खेड्यांपेक्षा मध्यवर्ती खेड्यांत साक्षारांचे प्रमाण महाराष्ट्रातील अनेक भागांत जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रात खाजगी संस्थानी केलेले प्रयत्न व स्वयंभावी व स्थानिक संस्थानी आखलेल्या साक्षरता मोहिमा यांना चांगली फळे आली आहेत.

महात्मा गांधीनी आपली शिक्षणसुधार योजना राष्ट्रापुढे ठेवल्यानंतर महाराष्ट्रात मूलभूत शिक्षणविषयक प्रयोगांना सुरुवात झाली. पण १९४२ ते १९४६ या काळात आर्थिक, व्यवस्थापकीय व विक्रीविषयक अडचणींमुळे त्यांची प्रगती बेताची झाली शिवाय प्राथमिक शिक्षणात सर्वसामान्य प्राथमिक शाळा व मूलभूत शिक्षण शाळा यांतील तफावत पैशांची अधिकृत मदत कमी झाल्यापासून कमी झाली होती.

स्वातंत्र्योत्तर काळात पश्चिम महाराष्टातील माध्यमिक शालान्त परीक्षा घेण्याकरता कायद्यानुसार बोर्डाची स्थापना केल्यामुळे माध्यमिक शिक्षण विश्वविद्यालयांच्या नियंत्रणातून सुटले. खाजगी संस्थाना द्यावयाच्या देणग्याबाबत असलेल्या नियमांबरोबरच माध्यमिक शिक्षकांच्या वेतन श्रेणीची देखील पुनर्रचना करण्यात आली. एकूणचे माध्यमिक शिक्षणाचा या काळात बराच प्रसार झाला.

१९४१ साली पुणे विश्वविद्यालयाची स्थापना १८५७ साली स्थापना झालेले मुंबई विश्वविद्यालय ही त्या तऱ्हेची एकमेव संस्था होती.
डॉ. धों के. कर्वे यानी १९१६ साली सुरू केलेल्या स्त्रियांच्या नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विश्वविद्यालयाला १९४१ साली मान्यता मिळाली. मुंबई विश्वविद्यालयाचा आरभं केवळ परीक्षा घेणारी संस्था असा झाला होता. याउलट पुणे विश्वविद्यालयाशी राज्यातली महाविद्यालये संलग्न होती व शिक्षण देणारी संस्था म्हणून त्याची स्थापना झाली होती, नागपूर व मराठवाडा विश्वविद्यालयेही स्थापण्यात आले. ३१ मार्च १९६० मधली खालील आकडेवारी उच्च शिक्षणाची जलद प्रगती दाखवते.

संस्थाची संख्या विद्यार्थी संख्या
पुरुष स्त्री एकंदर
विश्वविद्यालय
विश्वविद्यालयीन विभाग २५ २,१७० ३७४ २५४४
संशोधन संस्था १६ २६९ ७५ ३४४
कला व विज्ञान ६४ ५५,६६१ १७,४२४ ७३,०८५
शेतकी १४६५ १,४७१
वास्तुशास्त्र ५२८ २१ ५४९
उपयुक्त कला ३८४ १२४ ५०८
वाणिज्य १० ८६२४ ४३० ९,०५४
अभियांत्रिकी ३९७८ ११ ३,९८९
कायदा ४४४१ २४२ ४,६८३