Tag Archives: माशी

चाकावरील माशी

एका घोडयाची गाडी भरधाव चालली होती, तिच्या चाकावर बसून एक माशी आपल्याशीच म्हणते, ‘मी किती धूळ उडवते आहे ही !’ काही वेळाने ती माशी, घोडयाच्या पाठीस एक जखम झाली होती तिजवर बसून पुनः आपल्याशीच म्हणते, ‘घोडयास पळावयास लावणारे माझ्यासारखे दुसरे कोण आहे?’

तात्पर्य:- दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे घेऊन, त्याबद्दल बढाई मारीत बसण्याची पुष्कळ मूर्ख लोकांस संवय असते.