Tag Archives: मुमताज

आयुष्याचा काळ कोणाच्याही हातात नसतो

दारासिंग आणि मुमताज

दारासिंग आणि मुमताज

रुस्तम-ए-हिंद आणि ज्येष्ठ अभिनेते दारासिंग यांचे गुरुवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर दारासिंग यांच्या पत्नीशी मुमताज आणि त्यांचे पती मयूर मधवानी यांनी बातचीत केली.

‘एखादी व्यक्ती या जगातून गेली तर त्याच्याविषयी दुःखाशिवाय दुसरी कोणतीच भावना नसते. दारासिंग यांच्या अनेक आठवणी माझ्या मनामध्ये आहेत. त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे मला माहित होते. खरंच, आयुष्याचा काळ कोणाच्याही हातात नसतो. उत्तम अभिनेते आणि कलाकारांनी २०११ आणि २०१२ मध्ये जगाचा निरोप घेतल्यामुळे ही वर्षे फारशी चांगली म्हणता येणार नाहीत,’ असे मुमताज म्हणाल्या.

फौलाद (१९६३), वीर भीमसेन (१९६४), हर्क्युलस, आँधी और तुफान (१९६४), टारझन कम्स टू दिल्ली, टारझन अँड किंगकाँग (१९६५), सिकंदर इ आझम, रुस्तुम ए हिंद (१९६५), या चित्रपटात दारासिंग आणि मुम्ताज यांनी एकत्र काम केले आहे आणि ही सगळी चित्रपटे गाजलेली आहेत.