Tag Archives: लिंबू

फ्रूट पंच

साहित्य :

 • ४ कप गार पाणी
 • ५०० ग्रॅम साखर
 • २ कप संत्र्याचा रस
 • १ कप लिंबाचा रस
 • २ कप अननसाचा रस

कृती :

फ्रूट पंच

फ्रूट पंच

साखरेत पाणी घालून १० मिनीटे उकळ्वावे.

नंतर गार झाल्यावर सर्व रस त्यात ओतून फ्रीजमध्ये अगदी थंडगार करावा.

आयत्या वेळी त्यात अगदी थंडगार पाणी घालून सर्व्ह करावे.

पनीर

मात्रा:

 • ६०० ग्रॅम

साहित्य:

 • ३लि. दूध
 • १० मिली. लिंबाचा रस किंवा व्हिनेगर

कृती:

पनीर

पनीर

दूध उकळा व हलवत रहा. उकळी आल्यावर लिंबाचा रस किंवा विनेगर टाका.

लगेच दूध फाटेल व पाणी वेगळे होईल. पाणी गाळून वेगळे करा. पनीर गोळा करून कपड्यात बांधून लटकावून ठेवा.

सगळे पाणी निथरल्यावर उरेल तेच पनीर आहे. कापून लहान-लहान तुकडे करुन घ्या.

लिंबाचे गोड लोणचे

साहित्य:

 • ५ किलो लिंबु
 • २०० ग्रा. काळी मिरची
 • १०० ग्रा. मोठी वेलची
 • ५० ग्रा. जीरे
 • १० ग्रा. प्रत्येक दालचिनी
 • तेजपान
 • जावित्री
 • ५० ग्रा. लवंग
 • ५ नग जायफळ
 • १०० ग्रा. सिरका
 • ३ कि. साखर
 • ५०० ग्रा. आले
 • ४०० ग्रा. सेंधा मीठ
 • १०० ग्रा. काळे मीठ

कृतीः

लिंबाचे गोड लोणचे

लिंबाचे गोड लोणचे

मोठ्या आकारात लिंबू घ्यावे. धुवून पुसून उन्हात सुकवावे नंतर चार चार खापा या प्रकारे कापाव्या की त्या एका बाजुने जोडलेल्या राहतील.

आल्यास सोलुन बारीक करावे. सर्व मसाल्यांना अर्धवट कुटुन घ्यावे. नंतर त्यात साखर व विनेगर मिळवून लिंबामध्ये भरून लिंबाना बरणीत ठेवावे व बरणीस चांगल्या तर्‍हेने बंद करून उन्हात ठेवावे.

१०-१५ दिवसात लोणचे तयार होऊन जाईल.

सफरचंदाचा मुरंबा

साहित्यः

 • १ किलो सफरचंद
 • १ कि. साखर
 • २ चमचे मीठ
 • २ लिंबाचा रस
 • आवश्यकतेनुसार पाणी

कृतीः

सफरचंदाचा मुरंबा

सफरचंदाचा मुरंबा

सफरचंद सोलून त्यांचा मधला भाग व बी काढुन टाकावे. साखरेत थोडेसे पाणी व लिंबाचा रस टाकुन एकतारी पाक बनवावा.

सफरचंद पाण्यातुन काढावे व पुसून पाकात टाकावे आणि नरम झाल्यावर पाकासहित काचेच्या बरणीत भरावे.

हा मुरंबा हृदयाच्या रोग्यांना फायदेशीर आहे.

अननसाचा मुरंबा

साहित्य:

 • १ कि. अननस
 • १॥ कि. साखर
 • ५ ग्रा. मीठ
 • २ ग्रा. चुना
 • २ ग्रा. केवढा
 • ४ नग लिंबू
 • २ ग्रा. वेलची
 • पाणी आवश्यकतेनुसार

कृतीः

अननसाचा मुरंबा

अननसाचा मुरंबा

पिकलेले अननस घेऊन चाकून त्याचा काटेवार भाग सोलुन फेकावे. आता अननसाला चुना व मीठ लावून एका कपड्यात बांधावे ज्यामुळे त्याचे पाणी निघून जाईल. नंतर तुकडे बनवावे व आता एका कल्हईदार किंवा स्टीलच्या भांड्यात साखरेत पाणी टाकुन एक तार पाक बनवावा. नंतर अननसाचे तुकडे यात टाकावे यानंतर पाक घट्ट झाल्यावर खाली उतरून घ्यावे. लिंबाचा रस व केवडा टाकावा यानंतर वेलची अर्धवट कुटून मिळवावी थंड झाल्यावर बरणीत भरावे.

लिंबाचे औषधी उपयोग

लिंबाचे अनेक औषधी उपयोग :

लिंबाचे औषधी उपयोग

लिंबाचे औषधी उपयोग

लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबु उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा.

अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो.

पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते.

मेदवृद्धि म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस उन पाण्यात घालून घेतल्याने उपयोग होतो.

वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो.

नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.

लिंबाच्या सालीचे लोणचे

साहित्य :

 • २०-२५ लिंबांच्या साली
 • १ वाटी मीठ
 • पाव वाटी लाल तिखट
 • २ वाट्या साखर

कृती :

एका वेळेस इतकी सगळी लिंबे हवीत असे नाही. रोजच्या वापरात लिंबाचा रस काढून झाला की सालीचे चार तुकडे जराशा मीठात घोळवावे व एका घट्ट झांकणाच्या मोठ्या बाटलीत भरावे. साली साठत जातील तशा मीठात घोळवून बाटलीत भराव्या आवश्यक वाटल्यास थोडे जास्त मीठ घालावे.

सर्व जिन्नस एका थाळ्यात किंवा तसराळ्यात कालवावे. बाटलीतल्या सालीही त्यात मिसळाव्या. रुंद तोंडाच्या बरणीत हे मिश्रण भरावे. चौपदरी मलमली फडल्याचा दादरा बांधावा व बरणी ८-१० दिवस उन्हात ठेवावी. संध्याकाळी उचलून घरात ठेवताना बरणी हलवावी. दहा दिवसांनंतर दादरा सोडून झाकण लावावे. झाकणावरून दुसरा दादरा बांधांवा. लोणच्याचा रंग बदलला की ते तयार झाले असे समजावे. आवश्यक वाटल्यास मीठ व साखर थोडी जास्त घालावी.

लेमन डिलिशियस पुडिंग

साहित्य :

 • २ मोठे चमचे पांढरे लोणी
 • पाऊण वाटी साखर
 • १ मोठे लिंबू
 • १ कप दूध
 • २ अंडे
 • २ मोठे चमचे मैदा
 • एक चिमटी मीठ.

कृती :

लेमन डिलिशियस पुडिंग

लेमन डिलिशियस पुडिंग

अंड्यातले पिवळे व पांढरे वेगवेगळे फेसावे. लोणी व साखर मिसळून हाताने किंवा मिक्सरमध्ये खूप फेसावे.

मैदा मीठ घालून चाळून घ्यावा. लिंबाची साल कापून किसून घ्यावी व लिंबाचा रस काढून वेगळा ठेवावा.

लोणी-साखरेत चाळलेला मैदा, लिंबाच्या सालीचा कीस, लिंबाचा रस, अंड्यातले पिवळे व दूध घालून मिश्रण घोटून घ्यावे.

अंड्यातले फेसलेले पांढरे हळूहळू मिश्रणात घालून पुन्हा एकजीव होईपर्यंत घोटावे. ओव्हनमध्ये ठेवण्यासाठी ओव्हनप्रूफ भांडे आतल्या बाजूने ओले करावे व त्यात हे मिश्रण ओतावे.

दुसऱ्या एका उथळ भांड्यात किंवा ट्रेमध्ये पाणी घालून त्यात मिश्रणाचे भांडे ठेवावे. मध्यम ओव्हनमध्ये ३० ते ४० मिनिटे भाजावे.

हे पुडिंग काळजीपूर्वक व शांतपणाने करावे. चवीला खूप छान लागते.

कारल्याची भाजी करताना

कारले

 • कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात.
 • स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा. स्वच्छ होतील.
 • बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वचा व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका.
 • पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या. बरे वाटेल.
 • घरातील कोणताही पंखा (एक्झॉट फॅनसुद्धा) स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंधी बुडवून त्याने फॅन घासून पुसा.
 • भाजा फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा. दोन-तीन दिवसानंतर स्पंजाचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा.
 • कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा.
 • दोसा बनविताना दोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा.