Tag Archives: वंदना विटणकर

येरे येरे पावसा

येरे येरे पावसा रूसलास का ?
माझ्याशी गट्टी फूं केलीस कां ?
केलीस कां ? ॥धृ॥

झर झर झर तू येणार कधी
अंगणात पाण्याची होईल नदी
ढगांच्या मागे असा लपलास कां ?
माझ्याशी गट्टी फूं केलीस कां ?
केलीस कां ? ॥१॥

गार गार वाऱ्यात नाचेन मी
खुप खुप पाण्यात भिजेन मी
विजेची टाळी मला देतोस कां?
माझ्याशी गट्टी फूं केलीस कां ?
केलीस कां ? ॥२॥

धुमदार पाण्यात रस्ता बुडेल
आज माझ्या शाळेला सुट्टी मिळेल
गड गड गड असा हंसतोस का ?
माझ्याशी गट्टी फूं केलीस कां ?
केलीस कां ? ॥३॥