Tag Archives: शोधपत्रकार

सिनेपत्रकार बी. के. करंजिया यांचे निधन

बी. के. करंजिया

बी. के. करंजिया

ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि नॅशनल फिल्म्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एनएफडीसी) माजी अध्यक्ष बरजोर तथा बी. के. करंजिया (९२) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी रात्री पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

करंजिया यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील क्वेट्टा येथे जन्म झाला. भारतामध्ये ते फाळणीनंतर आले. ते इंडियन सिव्हील सर्व्हिससाठी क्वालिफाय झाले होते. नंतर वार्ताहर म्हणून त्यांनी पत्रकारिता सुरु केली. त्यांचे बंधू रुसी करंजिया शोधपत्रकार होते. सिनेमाविषयी लेखन करण्यास करंजिया यांनी प्रारंभ केला. फिल्मफेअर, स्क्रीन, सिनेव्हॉइस, मूव्ही टाईम्स अशा विविध नियतकालिकांचे संपादकपद त्यांनी भुषविले. फिल्म फायनान्सिंग कॉर्पोरेशनच्या स्थापनेत त्यांनी मोलाचे योगदान केले.

‘एनएफडीसी’च्या अध्यक्षपदी असताना करंजिया यांनी अनेक सिनेमांच्या निर्मितीसाठी साह्य केले. बड्या निर्मात्यांऐवजी लो बजेट पण दर्जेदार सिनेमांना अर्थसाह्य करायला त्यांनी सुरुवात केली. करंजिया यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजले.