Tag Archives: सणासुदीचे पदार्थ

पांढरी चकली

साहित्य :

  • ५०० ग्रॅम तांदूळ
  • २५० ग्रॅम हरभऱ्याची डाळ
  • २ टे. चमचा डालडाचे मोहन
  • १ चमचा जिरे
  • थोडा हिंग
  • मीठ.

कृती :

पांढरी चकली

पांढरी चकली

तांदूळ धुवून कपड्यावर पसरून वाळवा.

हरभऱ्याची डाळ लालसर रंगावर येईपर्यंत भाजा.

नंतर दोन्ही एकत्र करून दळून आणा.

नंतर त्यात डालडा, जिरे, हिंग व मीठ घालून पीठ भिजवा व चकल्या पाडून तळा.