Tag Archives: सरम्मा पार्क

दुसरा आंतराराष्ट्रीय फ्लॉवर फेस्टिवल

दुसरा आंतराराष्ट्रीय फ्लॉवर फेस्टिवल

दुसरा आंतराराष्ट्रीय फ्लॉवर फेस्टिवल

ईशान्य कडील राज्यांच्या समुहातील सिक्कीम हे राज्य फुलशेतीसाठी प्रसिध्द आहे. इथं फुलणाऱ्या वेग-वेगळ्या फुलांनी देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकांना भूरळ घातली आहे. विपुल जैवविविधता असलेलं हे राज्य यंदा दुसरा आंतरराष्ट्रीय फ्लॉवर फेस्टिवल आयोजित करत आहे. या राज्यात ऑर्किडच्या सुमारे ६०० जाती आहेत. तसेच नेच्या २४० जाती, गॅलिडीओसच्या १५० जाती, मॅग्नेलिया तसेच अन्य काही वैविध्यपुर्ण फुलांचे प्रकार इथे आढळतात. सिक्कीम मधली फुलशेती सातत्याने लोकप्रिय होत असून सुशिक्षित युवक उपजिविकेचे साधन म्हणून या फूलशेतीचा पर्याय निवडत आहे. सिक्कीम मध्ये २१० हेक्टर जमिनीवर फूले आहेत. म्हणूनच हा फेस्टीवल सिक्कीमचा फ्लोरिक्लचर डेस्टिनेशन म्हणून प्रसार करण्यात महत्वाची भूमिका पार पाडेल असा विश्वास सिक्कीम राज्य सरकारला वाटतो आहे.

या फेस्टीवलमूळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. राष्ट्रीय आणि आतंराराष्ट्रीय स्तरावर याचा प्रसार होईल. तसेच या क्षेत्रातील उपलब्ध संधीची माहिती होईल आणि त्याचबरोबर या क्षेत्रातील गूतंवणूक ही वाढेल असे बहूउद्देश या फेस्टिवल मूळे साध्य होणार आहे. अशा या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमात महाराष्ट्र आणि अन्य राज्यातील फुल उत्पादकांनी सहभागी व्हावं असं आवाहन सिक्कीम राज्य सरकार तर्फे करण्यात आलं आहे. महाराष्ट्राची फुलशेतीत स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. हायब्रिड गुलाब, जरबेरा, कार्नेशन या फुलांची निर्यात करण्यात नाशिक, पुणे, नागपूर ही राज्ये आघाडीवर आहेत. म्हणूनच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावं असं अवाहन करण्यात आलं आहे.

सिक्कीमची राजधानी असलेल्या गंगटोक जवळच्या सरम्मा पार्क मध्ये २३ ते २७ फेब्रूवारी या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात २५ आंतरराष्ट्रीय, ३० राष्ट्रीय आणि १९० स्थानिक फूल उत्पादक सहभागी होणार आहेत.
अधिक माहिती साठी www.internationalflowershowsikkim.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा.