Tag Archives: सरसों

हिरव्या मिरचीचे लोणचे

साहित्य:

  • १/२ किलो हिरवी मिरची
  • १/२ वाटी सरसों
  • २ मोठे चमचे बडीशेप
  • १ लहान चमचा हळद
  • १/२ वाटी तीळ
  • ३ मोठे चमचे आमसूल पावडर
  • २ मोठे चमचे मीठ
  • १ वाटी सरसोचे तेल

कृती:

हिरव्या मिरचीचे लोणचे

हिरव्या मिरचीचे लोणचे

हिरवी मिरची धुऊन पुसून घ्या. चाकून मधोमध उभी चिर मारा. एका कढईत तीळ घेऊन भाजा. सरसो बारीक मिक्सरमधून काढा, सर्व मसाले एका ताटेत घेऊन एकत्र करा. थोडेसे तेल टाका. आता हे मिश्रण मिरचीत भरा. मिरची एका बरणीत भरून बाकीचे तेल टाका व २ दिवस ठेऊन द्या. दोन दिवसांनी लोणचे तयार.