Tag Archives: सरसो तेल

भरली कारले

साहित्य:

  • ८ लहान ताजे कारले
  • २ कापलेले कांदे
  • ४ पाकळी लसूण पेस्ट
  • २ मोठे चमचे तेल सरसो
  • १ मोठा चमचा आमचूर
  • १ मोठा चमचा धणे पावडर
  • १ चमचा जीरे पावडर
  • १ चमचा गरम मसाला
  • १/२ कप टोमॅटो प्यूरी
  • चवीनुसार मीठ

कृती:

भरली कारले

भरली कारले

कारल्याचा वरील खरबरीत भाग चाकून काढून अलग करावा त्याचे पोट चिरावे आणि मीठ टाकुन रात्रभर ठेवावे. सकाळी वाहत्या पाण्याने धुवून मीठ काढून टाकावे.

कढईत एक चमचा तेल गरम करून कांदा व लसूण टाकावे व एक मिनीट फ्राय करावे, आमचूर, धणे, जीरे, गरम मसाला, मीठ आणि टोमॅटो प्यूरी टाकावी आणि मंद गॅसवर पाणी सुकेपर्यंत फ्राय करावे.

फ्राय मसाला कारल्यात भरून धाग्याने बांधावे म्हणजे मसाला बाहेर निघणार नाही. कढईत बाकी तेल गरम करून भरलेल्या कारल्यास आपल्या आवश्यकतेनुसार फ्रायकरून काढून घ्यावे.