Tag Archives: सरोद वादन

सवाई महोत्सवाच्या बहारदार मैफिली

सवाई महोत्सवाच्या बहारदार मैफिली

सवाई महोत्सवाच्या बहारदार मैफिली

६० वर्षांची परंपरा असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा मंगळवारी शुभारंभ झाला. रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणी असलेल्या सवाई गंधर्वाच्या पहिल्याच सत्रात मंगल वाद्य सनई ने रंग भरले. पंडित जसराज यांच्या स्वरांनी आणि राहूल शर्मा यांच्या संतूर वादनाने सवाईची पहिली मैफील रंगली.

सवाईच्या दुसऱ्या सत्राची सुरवात झाली ती पंडित रविशंकर यांना श्रध्दांजली अर्पित करुन. यावेळी पंडित रविशंकर यांच्या सवाई महोत्सवाची निगडीत आठवणींना उजाळा ही देण्यात आला. दुसऱ्या सत्रातील रतन शर्मा यांच्या गायनाने दुसऱ्या सत्राला सुरवात झाली. रतन मोहन शर्मा यांनी शुध्द वराळी रागातील बंदीश सादर केली आणि रसिकांना मंत्रमूग्ध केले. आपल्या गायनाचा समारोप रतन मोहन यांनी ’अबिर गूलालाची’ या भजानाने केला आणि रसिकांनी वन्स मोर म्हणत भरभरुन प्रतिसाद दिला. या नंतर उस्ताद अमजद अली खॉ यांचे चिरंजीव अयान आणि अमान खॉ यांचे सरोद वादन झाले. या दोन्ही बंधूंची वाद्यावर फिरणारी बोट आणि त्यातून निर्माण झालेला श्रवणीय नाद रसिक प्रेक्षकांना सूखावून गेला. यानंतर शोभना चंद्रकूमार यांच्या भरतनाट्यम्‌ नी मैफिल अधिकच रंगली मल्लारी, वर्णम, कृती, अष्टपदी अशा चार रचना त्यांनी सादर केल्या. पंडित राजन साजन मिश्रा आणि त्यांचे चिरंजीव रितेश व रजनीश यांच्या एकत्र गान मैफिलीने दुसऱ्या सत्राची सांगता झाली. या पिता-पूत्र आणि गुरू-शिष्य जोडीच्या सहगायानाने सोहळा उत्तोरतर रंगत गेला.

तिसऱ्या सत्रात पं कूमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या असलेल्या कोमकली यांचे गायन झाले. मुलतानी रागातील तीन रचना त्यांनी सादर केल्या. उत्तरारार्धाची सुरवात फारूख लतिफ खान आणि सरवर हूसेन यांच्या सारंगीवादनाने झाली. काका पुतण्याच्या या जोडीने रंगमंचावरिल त्यांच्या जुगल बंदीने रसिकांना खिळवले. त्यानंतर आलेल्या समीहन कशाळकर या यूवा कलाकाराने केदार रागातील ’ऎसी मनभावन बनठन चली’ ही रचना बुजुर्ग कलाकारांच्या इतकीच ताकदीने सादर केली. सवाईत प्रथमच गात असलेला समीहन सवाई रंगमंच्या कसोटीवर पुर्णपणे उतरला हे प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या सादातून वेळोवेळी सिध्द झाले. यानंतर पं उल्लहास कशाळकर आणि समीहन कशाळकर या पिता पूत्रांनी अप्रितम भैरवी सादर केली.

सवाई महोत्सवाची सर्वच सत्र ऎकापेक्षा ऎक अशी सरस होत आहे. या सर्वच सत्रांना रसिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहे.