Tag Archives: सर्जेराव जाधव

दहावी निकालात राज्याला डिस्टिंक्शन

एसएससी बोर्डाचा निकाल

एसएससी बोर्डाचा निकाल

या वर्षीचा दहावीचा निकाल मागील वर्षापेक्षा चांगला लागला असून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याला डिस्टिंक्शन मिळवून दिले आहे. उत्तीर्णांचे प्रमाण या वर्षी ७४.९८ इतके आहे. उत्तीर्णांचे प्रमाण पहिल्यांदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये (फ्रेशर्स) ८१.३२ टक्के आहे. कोकणाने बारावीप्रमाणेच दहावीतही आपला झेंडा पटकवला असून, तेथील निकाल ९३.९४ टक्के आहे. ९०.७१ टक्के मिळवून पुणे विभाग दुसर्‍या स्थानी आहे. परंपरेप्रमाणे यावर्षीही मुलींनी मुलांना मागे टाकले आहे.

राज्यातील नऊ विभागीय मंडळांचा एकत्रीत निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी बुधवारी जाहीर केला. १७ लाख ७५० विद्यार्थी यंदाच्या दहावीच्या परीक्षेला बसले होते. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२,७५,२०७ इतकी आहे. १४,८५,७०० विद्यार्थी फ्रेशर्स होते व त्यांपैकी १२,०८,१७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुली तीन टक्क्यांनी मुलांपेक्षा पुढे आहेत. ८२.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत आणि मुलांमध्ये उत्तीर्णतेचे प्रमाण आहे ७९.९० टक्के. जे विद्यार्थी पुन्हा परीक्षेला बसले होते त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण आहे ३१.१७ टक्के.

बोर्डाने परीक्षा काळात गैरप्रकारांविरोधात जी मोहीम राबविली होती त्यात १८०९ कॉपी-तोतयेगिरीच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. मागील वर्षापेक्षा या वर्षी कॉपी करणार्‍यांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे.

विभागांप्रमाणे निकाल

  • कोकण : ९३.९४ टक्के
  • पुणे : ९०.७१
  • कोल्हापूर : ८९.१७
  • मुंबई : ८८.९४
  • नाशिक : ७७.०७
  • नागपूर : ७४.५५
  • औरंगाबाद : ७१.३६
  • अमरावती : ७०.०७
  • लातूर : ६९.०१