Tag Archives: सर्प

साळू आणि सर्प

‘मला आपल्या बिळात जागा दयाल तर मी तुमची फार आभारी होईन.’ अशी एका साळूने सर्पांस विनंती केली. सर्पांनी अविचाराने तिची विनंती मान्य करून तिला आपल्या बिळात येऊ दिले. ती आत शिरताच तिची काटयांसारखी तीक्ष्ण पिसे अंगास रुतून सर्पांस मोठे दुःख झाले. मग ते तिला म्हणाले, ‘साळूबाई, आता तुम्ही येथून जाल तर बरे होईल, तुमचा हा उपद्रव आमच्याने सहन करवत नाही. ’ हे ऐकताच साळू उत्तर करिते, ‘मी का जाईन ? मला तर ही जागा फार आवडली; ज्यास ती आवडत नसेल त्यांनी पाहिजे तर खुशाल जावे. ’

तात्पर्य : काही लोक असे दृष्ट असतात की, एकदा त्यांस दुसऱ्याच्या घरी आश्रय मिळाला की, हळूहळू त्यास घराबाहेर काढून ते घर ते बळकावून बसतात.