Tag Archives: सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

सप्त सुरांचा समारोप

गेले ६ दिवस सवाईतले रसिक मुलतानी, यमन, मालकंस, कलावती, राग श्री या रागात न्हाऊन निघाले. किराणा, मेवाती, आग्रा, लखनऊ घराणी आणि कुमार गंधर्वाची गायकीने रसिकांना सवाई महोत्सवाच्या रुपाने पर्वणीच मिळाली. सवाई महोत्सवाची शेवटची मैफिली यादगार झाली. सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रात झालेल्या या मैफिली रसिकांना हुरहूर लावून गेल्या. कल्पना झोकरकर, पंडित विजय पोखकर यांच्या गायकीने आणि पंडीत शिवकुमार शर्मा या संतूर वादनाने रसिकांना ईश्वरी सूरांचा अनुभव घेता आला. यांनतर पंडीत भीमसेन जोशी यांची तिसरी पिढी रंगमंचावर आली. पंडीत भीमसेन जोशी यांच्या ९ वर्षांच्या नातवाने विराजने ‘माझे माहेर पंढरी’ आणि ‘भजन हेच माझी ध्यान’ असे दोन अभंग सादर करून रसिकांची मनं जिंकली.

संध्याकाळच्या मैफिलीत शौनक अभिषेकी, परमेश्वर हेगडे, उपेंद्र भट, अपुर्वा गोखले, पल्लवी जोशी या गायकांनी रंग भरले. शौनक अभिषेकी यांनी गायलेल्या ‘नाही पुण्याची मोजणी, नाही पापची टोचणी’ या गीताने तर स्वर मंडप भारावून गेला. उस्ताद शाही कुमार परवेझ यांची सतार आणि अतुलकुनार पंडीत उपाध्ये यांची व्हायोलिन या जुगल बंदीने सवाईची शेवटची मैफिल यादगार झाली.