Tag Archives: सांज्याच्या पोळ्या

सांज्याची पोळी

साहित्य :

  • १ मोठी वाटी रवा
  • १ १/२ वाटी बारीक चिरलेला गूळ
  • १ १/२ वाटी पाणी
  • ५-६ वेलदोड्यांची पूड
  • २ १/२ वाट्या कणीक
  • ३ टेबलस्पून तेलाचे मोहन

कृती :

सांज्याची पोळी

सांज्याची पोळी

थोड्या तूपावर रवा खमंग भाजावा व बाजूला ठेवावा. १ १/२ वाटी पाण्यात बारिक चिरलेला गूळ घालून गॅसवर ठेवावे.

गूळ विरघळला की त्यात भाजलेला रवा घालून उलथण्याच्या टोकाने ढवळून झाकण ठेवून वाफ आणावी. व मऊ शिरा करावा. वेलची पूड घालावी. रवा जाड असेल तर पाणी थोडे जास्त घालावे.

कणकेत मीठ व तेलाचे मोहन घालून रोजच्या पोळीच्या कणकेसारखी कणीक भिजवून ठेवावी.

शिरा निवला की चांगला मळून घ्यावा. नंतर कणाकेची पारी करुन त्यात वरील सांज्याचे पुरणा भरुन उंडा तयार करावा.

नंतर तांदळाच्या पिठीवर पोली लाटावी.

दोन्हीकडून चांगली खमंग भाजावी व वरुन तूप सोडावे.