Tag Archives: सांबार मसाला

टोमॅटोचे सांबार

साहित्य :

  • ५०० ग्रॅम टोमॅटो
  • १ मोठा कांदा
  • १/४ वाटी मसुराची डाळ
  • २ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा तिखट
  • २ चमचे सांबार मसाला
  • मीठ
  • साखर
  • कडीपत्ता

कृती :

टोमॅटोचे सांबार

टोमॅटोचे सांबार

कांदा व टोमॅटो बारीक चिरावेत. नंतर मसुराची डाळ, कांदा व टोमॅटो एकत्र करुन शिजवून घ्यावेत.

नंतर त्यात थोडे पाणी घालून पुरणयंत्रातून काढावे.

त्यात तिखट, मीठ, साखर व सांबार मसाला घालावा.

हिंग, मोहरी, हळ्द घालून तेलाची फोडणी द्यावी.

फोडणीत मिरच्यांचे तुकडे व कडीपत्ता घालावा.