Tag Archives: साखर भात

साखर भात

साहित्य :

  • १ भांडे तांदूळ
  • १ भांडे साखर
  • ४-५ वेलदोडे
  • ४ लवंगा
  • खाण्याचा रंग
  • केशर
  • बदाम
  • बेदाणे
  • २ चमचे तूप

कृती :

साखर भात

साखर भात

तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत. २ चमचे तुपात लवंगा घालून गरम कराव्यात.

त्यानंतर तुपात तांदुळ घालून मोकळा भात शिजवून घ्यावा.

साखरेचा गोळीबंद पाक करून घ्यावा. या पाकात केशर, बदाम, वेलदोडे, बेदाणे घालावेत. पाकात हळूहळू भात ओतत जावा व मंदाग्नीवर १० मिनिटे शिजू द्यावा.

पाणी बेताचे घातल्यास भात मोकळा होतो.