Tag Archives: सातारे

सातारे खंडोबा

(जि :- औरंगाबाद महाराष्ट्र)
हे तीर्थक्षेत्र औरंगाबादपासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. देऊळ हेमाडपंथी व १ हजार वर्षापूर्वीचे आहे. मार्गशीर्ष शु. १ ते चंपाषष्ठी या काळात उत्सव असून त्यावेळेस देवळातून पालखी निघून ती तेथील जहागीरदार यांच्या वाड्यात येऊन तेथे सकाळी १० ते १२ या वेळेत पूजा व लघुरुद्र होऊन पालखी रात्री ८ वाजेपर्यंत देवळात परत येते. सदरच्या उत्सवात खर्च रु. ३० ते ४० हजार येतो.

देवस्थानास स्वतःचे असे काही उत्पन्न नाही. भक्तांच्या देणगीवरच सर्व खर्च अवलंबून असतो. पुजारी श्री. प्रभाकरन विनायक धुमाळ असून ही त्यांची ८वी पिढी आहे. देवस्थानचा ट्रस्ट आहे.

लोकसंख्या  :-

१५००

मार्ग :-

औरंगाबाद ( महाराष्ट्र ) पासून १॥ कि.मी. अंतरावर