Tag Archives: साबुदाणा वडा

साबुदाणा वडा

साहित्य :

  • २ १/२ वाट्या साबुदाणा
  • १ १/४ वाटी दाण्याचे कूट
  • ५-६ मध्यम आकाराचे बटाटे
  • तिखट
  • मीठ
  • जीरे

कृती :

साबुदाणा वडा

साबुदाणा वडा

साबुदाणा २ तास अगोदर धुवून ठेवावा.

बटाटे उकडून साले काढून घ्यावीत.

ताटलीत वरील सर्व पदार्थ एकत्र करावेत आणि चांगले मळून घ्यावेत.

मळून झाल्यावर छोटे छोटे वडे करुन लालसर तळून घ्यावेत.

हे गरमागरम वडे कोथिंबीरच्या चटणीसोबत सर्व्ह करावेत.