Tag Archives: साय

सायीच्या करंज्या

साहित्य :

  • दूध-बदाम-चारोळी-पिस्ते ह्यांचा अर्धवट कुटलेला चुरा
  • थोडी वेलची पूड
  • थोडा खडीसाखरेचा चुरा.

कृती :

चांगली साय येणारे दूध घ्या. ते एकदा गरम करा. ५-६ वाट्यात ओतून फ्रिजमध्ये ठेवा. दुपारपर्यंत घट्ट सायीचा थर प्रत्येक वाटीवर जमा होईल. बदाम, चारोळी, पिस्ते कुटून जाडसर पूड तयार करा. खडीसाखरेची जाडसर पूड करून सर्व एकत्र करा. त्यात वेलची पूड घालून सारण करा. प्रत्येक वाटीतील दुधाला कडेने धारदार चाकू फिरवून नंतर उलथन्याने अलगद हाताने फक्त सायीचा थर काढा व एका ताटलीत ठेवा. त्यावर वरील सारण थोडे घालून सुरीने त्याची घडी घातल्यासारखे करा. करंजीचा आकार येईल. कडेने कातण्याने कातून घ्या. अशा सर्व करंज्या कराव्या व फ्रीझरमध्ये थाळीत ठेवाव्यात. तळायच्या वगैरे नाहीत.

लाडकया लेकासाठी, जावयासाठी किंवा खास समारंभाला म्हणून मजेने ५-६ कराव्या.