Tag Archives: सावरकर स्मारक

भारत स्वाभिमान न्यास आज पेटले

 Bharat Swabhimaan Nyas Protest

भारत स्वाभिमान न्यासाने ३ जून रोजी म्हणजे आज स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे उपोषण करण्याची भूमिका घेतली आहे. एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सावरकर स्मारक येथे करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी महापालिका अधिकार्‍यांकडे वारंवार फेर्‍या मारुनही या गोष्टीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप भारत स्वाभिमान न्यास याने केला आहे. पत्रकार परिषदेत न्यासाचे जिल्हा समन्वयक विजय वरुडकर यांनी ही माहिती दिली.

डेक्कन जिमखाना येथील सावरकर स्मारकाजवळ सक्षम लोकपाल कायद्याच्या मागणीसाठी न्यासाच्या वतीने सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. १५ दिवसांपासून उपोषणाला परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न चालू होते. हे उपोषण सरकारविरुद्ध असल्यामुळे आम्ही याला परवानगी देऊ शकत नाही, असे कारण संबंधित अधिकार्‍यांनी सांगितल्यामुळे वरुडकर यांनी त्यांच्यावर आरोप केला आहे. वरुडकर यांनी असेही स्पष्ट केले की, अधिकार्‍यांच्या विरोधाकडे लक्ष न देता नियोजित ठिकाणीच उपोषण करण्यात येईल.