Tag Archives: सिंहीण

कोल्ही आणि सिंहीण

एका कोल्हीने एका सिहिणीपाह्सी आपल्या संततीची फार तारीफ केली. ती म्हणाली, ‘आम्हांस दरवर्षी किती तरी पोरे होतात, पण आम्ही त्यासंबंधाने कधी बढाई मारीत नाही. पण काही लोक असे आहेत की त्यांस एका वेळी एकच पोर होते, पण ते इतरांस तुच्छ लेखावयास कमी करीत नाहीत !’ कोल्हीने हा टोमणा आपणास दिला, हे लक्षात घेऊन सिंहिणीने उत्तर दिले, ‘बाई, तुम्हांस प्रत्येक खेपेला पुष्कळ मुले होतात, ही गोष्ट खरी आहे, पण तुमच्या मुलांस ‘कोल्ही’ म्हणतात, आणि मला जरी एकच मूल होते, तरी त्यास ‘सिंह’ म्हणतात, हे लक्षांत ठेवा.’

तात्पर्य:- कोणत्याही वस्तूची परीक्षा करावयाची ती संख्येवरून करावयाची नसते, तर त्या वस्तूच्या गुणावरून करावयाची असते.