Tag Archives: सिताफळ

सिताफळ, रामफळ आणि अंजीर

एके दिवशी, सिताफळ आणि रामफळ यांचे परस्परांच्या मोठेपणाबद्दल भांडण जुंपले. भांडता भांडता ती एवढया मोठयाने बोलू लागली की, त्यांचे बोलणे, जवळच्या बागेतल्या एका अंजिराने ऐकले. मग तो अंजीर त्यांस म्हणाला, ‘अरे, अशी भांडता काय ? आपण सगळे मित्र असता परस्परांशी असे भांडत बसावे, हे बरे नाही.’

तात्पर्य:- स्वतःच्या मोठेपणाबद्दल दुसऱ्याशी वाद घालीत बसण्याची सवय पुष्कळ लोकांस असते.