Tag Archives: सुधीर धावडे

शाळा झाल्या सुतासारख्या सरळ

शाळा झाल्या सुतासारख्या सरळ

शाळा झाल्या सुतासारख्या सरळ

‘१५ जूनपासून शाळा सुरु करण्याचा शासकीय आदेश आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल,’ असे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पुणे शहरातल्या शाळांना लेखी परिपत्रक पाठविले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना जेव्हा वृत्त समजले की, शहरातील अनेक इंग्रजी शाळा ११ जून किंवा त्यापूर्वीच सुरु होणार आहेत, तेव्हा त्यांनी शिक्षण उपसंचालकांची भेट घेऊन त्या शाळंवर कारवाई करण्याची मागणी केली. जाधव यांची ‘मनविसे’चे कोथरुड विभागाचे अध्यक्ष सुधीर धावडे यांनी कार्यकर्त्यांसोबत भेट घेतली.

सुतासारख्या सरळ होऊन ११ जूनला सुरु करण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या शाळांनी आता १५ जूनपासून वर्ग भरविण्याचा निर्णय घेतला आहे. पालक सभा बोलवून पोदार इंटरनॅशनल स्कूलने १५ जूनला शाळा सुरु होण्याचे कळविले. शाळेच्या प्रशासनाने यासंबंधीची माहिती नोटीस बोर्डावर पालकांनी विचारण्याच्या आधीच लिहून थेवली होती.

११ जूनपासून स्प्रिंगडेल स्कूलतर्फे शाळा सुरु होणार असल्याचे कळविण्यात आले होते. शाळेच्या मुखाध्यापिका शाळेच्या व्यवस्थापनाशी बोलून यावर फेरविचार करण्याबाबत गुरुवारी चर्चा करणार होत्या. मात्र पालकांना गुरुवारी सायंकाळपर्यंत तारखेच्या बाबत झालेले बदल कळविण्यात आलेले नाही. प्रयत्न करुनही शाळेचे रजिस्ट्रार व मुख्याधापक, यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.