Tag Archives: सैबेरिया

विश्वसंचार

उत्तरोत्तर विकसित होत जाणाऱ्या य ममत्वाच्या भावनेमुळेच हिंदू व्यक्तीचे मन फक्त स्वतःच्या, स्वसमाजाच्या, स्वराष्ट्राच्या विकासाने संतोष पावलेले नाही. विश्वात हा विकास, ज्ञान, प्रगति पोचावी, यासाठी प्रयत्न करणारे हिंदू लोक सैबेरियापासून न्यूझीलंडपर्यंत आणि मेक्सिकोपासून जपानपर्यंत पोचले होते. त्यांनी तेथेही सद्भावना पसविल्या त्याग, ज्ञान, संस्कृतीची ध्वजा तेथे रोवली, कोठेही स्थानिक लोकांवर अत्याचार, बळजबरी केली नाही. तेथील लोकांच्या शरीरावर नाही तर मनावर अधिराज्य गाजविले. एका कवीने म्हटले आहे.

“ तो नच राजा, राजकुमारही ।
नच कोणी श्रीमंत धनाढ्यही ।
विख्यात न तो कोणी कवीही
नच असल्या काहीच खुणा तरीही ।
जग वंदी तयासच पुन्हा पुन्हा ॥ ”