Tag Archives: सोनार

देव आणि लुच्चेगिरी

देवाने एकदा आपल्या नोकराला आज्ञा केली की, ‘ढोंग आणि लबाडीचे मिश्रण करून तू ते सगळ्या कारागिरांना वाटून दे. ’ त्याप्रमाणे नोकराने मिश्रण तयार करून वाटले. परंतु त्यातील खूपसे शिल्लक राहिले. तेव्हा त्या सेवकाने ते नंतर आलेल्या शिंपी आणि सोनार लोकांना वाटून टाकले.

तात्पर्य:- सगळ्या धंदयात लबाडी ही होतेच, परंतु सोनार आणि शिंपी हे लबाडीकरिता फार पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहेत.