Tag Archives: सोबत्यांनी टाकलेला

सोबत्यांनी टाकलेला

सोबत्यांनी टाकलेला, वंचनाचा डाव आहे
येथल्या आटापिटीला, जीवनाचे नाव आहे.

पाहती डोळे उदासी, ह्या कर्दमी लांब वाटा
वाकल्या पाठीवरी ह्या, सोबत्यांचे घाव आहे.

आगजाळ्या काळजीचा, बोचला हा खोल काटा
नेक कारागीर येथे, राबुनी बेनाव आले.

घेतला धोंडा उराशी, भोवताली मी जगूनी
या रस्त्यातूनी रक्त्यांच्या, पावलांचे धाव आहे.

चालला हा खेळ सारा, आंधळ्या कोशिंबिरीचा
घास आता पाखंराचे, चोरणारे साव आहे.