Tag Archives: सोयासॉस

चिकन लिव्हर

साहित्य :

 • पाव किलो चिकनचे लिव्हर
 • प्रत्येकी १ चमचा आले-लसूण पेस्ट
 • कोथिंबीर पेस्ट
 • लिंबूरस
 • ५-६ लसणाच्या पाकळ्या (बारीक चिरून)
 • २ सिमला मिरच्या (उभे काप करून)
 • १ कांदा (मोठे तुकडे करून)
 • अर्धा वाटी कांद्याची पात
 • १ चमचा सोयासॉस
 • तेल
 • स्वादानुरूप मीठ

मसाला :

 • १ चमचा गरम मसाला

कृती :

चिकन लिव्हर

चिकन लिव्हर

चिकनच्या लिव्हरला आले-लसूण-कोथिंबीर पेस्ट व लिंबूरस लावून अर्धा तास मॅरीनेट करत ठेवा.

पातेल्यात तेल गरम करून त्यात बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या परतवून घ्या.

नंतर त्यात मॅरीनेट केलेले लिव्हर घालून शिजू द्या.

चिकनमधील पाणी आटल्यावर त्यात कांदा, सिमला मिरची व चिरलेली कांद्याची पात घालून परतवा.

त्यात सोयासॉस व मीठ घालून एक वाफ येऊ द्या.

चिकन लिव्हर चिली गरमागरम सर्व्ह करा.