Tag Archives: स्क्वॅश

लेमन स्क्वॅश

साहित्य:

  • २ किलो लिंबू
  • २ किलो साखर
  • १ लि. पाणी
  • पिवळा रंग
  • पाव चमचा पोटेशियम मेटा बाय सल्फेट

कृती:

लेमन स्क्वॅश

लेमन स्क्वॅश

साखर व पाणी उकळा. एका तारेचा पाक तयार झाल्यावर गॅस बंद करा. पाक थंड झाल्यावर लिंबाचा रस काढून यात मिसळा. पिवळा रंग पोटेशियम मेटा बाय सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्या. एका ग्लासात पाणी व बर्फ टाका. थोडा स्क्वॅश मिसळून सर्व्ह करा.

लिंबाचा रस आधीपासून काढून ठेवल्यास कडवट होतो, तेव्हा ऐनवेळी टाकून मिसळा.